महाड | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबई गुजरात येथून मोठ्या संख्येने चाकरमानी महाड तालुक्यासह संपूर्ण कोकणात दाखल झाले आहेत. दीड दिवसीय आणि रविवारी पाच दिवसांच्या गणेशाचे विसर्जन केल्यानंतर, आता परतीच्या प्रवासाची वेळ जवळ येत असून, प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एस.टी. महामंडळाच्या महाड आगाराने यंदाही विशेष तयारी केली आहे.
बेणसे | ऐन गणेशोत्सवात बुधवारी (२७ ऑगस्ट) पहाटे चार ते दुपारी बारा वाजेपर्यंत सुधागड तालुक्याची वीज तब्बल आठ तास गुल होती. झाड व वीज पडल्याने विद्युत तारा तुटल्या आणि इन्सुलेटर फुटले यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.
अलिबाग | जिल्हा पोलीस कार्यक्षेत्रातील संवेदनशील भागांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी जिल्ह्यात (पोलीस अधीक्षक रायगड कार्यक्षेत्रात) पोलीस विभागाची पूर्वपरवानगी शिवाय ड्रोन कॅमेर्याचा वापर करण्यास बंदीचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.
पनवेल | पनवेलच्या एका ज्येष्ठ कलाकाराने पाच वर्षांपूर्वी थर्माकॉलच्या मखराला पर्याय म्हणून लाकडापासून तयार केलेली मनमोहक आरासचा पर्याय शोधला आहे. यंदा त्यांनी आपले दालन नवीन पनवेल या ठिकाणी थाटले आहे. हे मखर पुढील अनेक वर्षीही वापरता येऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अलिबाग | अलिबाग तालुक्यातील शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्र व धेरंड शहापूर औद्योगिक क्षेत्राकरिता पोहच रस्त्याकरिता शहाबाज येथील एकूण ८.५५.८० हे.आर. क्षेत्र संपादीत होत आहे. यामुळे बाधित शेतकर्यांना संपादन होणार्या क्षेत्राचा मोबदला वाटपास सुरुवात झाली आहे.
मुंबई | राज्यातील शासकिय अधिकारी, कर्मचारी तसेच निवृत्ती वेतनधारक यांच्यासाठी शासनाने खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव सणाचा उत्साह आणि गणेशोत्सवाची धूम लक्षात घेता ऑगस्ट महिन्याचा पगार ५ दिवस आधीच बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
मुंबई | कोकणात गणेशोत्सवासाठी गावी जाणार्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची माहिती दिली. त्यासाठी, गणेशभक्तांना पास मिळवण्यासाठी यंत्रणाही उभी करण्यात येत आहे.
खोपोली | तालुक्यातील इर्शाळवाडी दरडग्रस्तांवर आभार कोसळले आणि काही क्षणात होत्याचे नव्हते झाले. अनेकांचा मृत्यू झाला. सरकारने या वाडीमधील लोकांचे डोंगराच्या पायथ्याशी पुर्नवसन करुन दिले. टुमदार घरं, पाणी, रस्ता, वीजही दिली; मात्र मूळ गाव सुटल्याने दरडग्रस्तांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असतानाच, चौक ग्रामपंचायतीने आकारलेल्या घरपट्टीची रक्कम बघून फेफरं येण्याची वेळ इथल्या दरडग्रस्तांवर आली आहे.
कर्जत | तालुक्यात सलग तीन चार दिवस पाऊस आहे, मात्र पाऊस थांबून पडत असल्याने सर्व नद्या धोक्याच्या पातळीपुढे गेलेल्या नाहीत. दरम्यान, उल्हास नदीवरील कमी उंचीच्या दहिवली मालेगाव येथील पुलावरून पाणी जात असल्याने पोलिसांनी या पुलावरील वाहतूक बंद केली आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील सावेळे ग्रामपंचायतीतील साळोख आदिवासी वाडीतील दिर आणि भावजय शेवग्याचा पाला काढण्यासाठी गेले असता शेवग्याच्या फांदीवर उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर ते चिकटले. विजेच्या धक्क्याने या दिर भावजयचा मृत्यू झाला.
गोरेगाव | मुसळधार पावसामुळे ढालघर लोणशी उणेगाव गोरेगाव मार्गे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या सुरक्षेचा विचार करून वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
खोपोली | खोपोलीचे माजी उपनगराध्यक्ष कुलदिपक शेंडे यांच्या प्रवेशाने शिवसेनेचे संघटन आणखी मजबूत होणार असून ग्रामीण भागातही पक्षाचा विस्तार करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते, मंत्री भरत गोगावले यांनी केले आहे. बुधवारची गटारी ते आज रात्रीच करतील, असा टोलाही गोगावलेंनी लगावला आहे.
21.1k
कोर्लई | मुरुड तालुक्यातील मीठेखार येथे घरालगत असलेली संरक्षक भिंत मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी कोसळली. आवाजाच्या दिशेने पाहण्यासाठी गेलेल्या विठा मोतीराम गायकर (वय ७५) या वृद्ध महिलेच्या अंगावर डोंगराच्या मातीचा मलबा येऊन गाडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मुरुड-जंजिरा | मुरुडच्या काशिद समुद्रकिनार्यावर चरसने भरलेली गोणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल ११ किलो १४८ ग्रॅम चरसचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची किंमत ५५ लाख ७४ हजार आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या संपूर्ण परिसराची तपासणी करत, किनार्यावर आणखी कुठे किंवा पाकीटे सापडतात का? याचा शोध घेतला.
लोणेरे | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या लाखो वाहनचालक आणि प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले लोणेरे येथील उड्डाणपुलाचे काम अखेर अंतिम टप्प्यात असून, गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
रोहा | रोहा नगरपरिषद हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील वादादीत टपर्या अखेर बुधवारी (२० ऑगस्ट) जमीनदोस्त करण्यात आल्या. पोलिसांच्या संरक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाने ही कारवाई केली. म्हाडा वसाहतीचे शेकडो रहिवासी रस्त्यावर उतरले होते.
रोहा | रोहयात पारंपारिक पध्दतीने गोकुळाष्टमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. रोहयात सततधार पाऊस सुरू होता, या पावसाने गोविंदा पथकांमध्ये जान आणली, हा पारंपारिक सण अतिशय आनंदात साजरा झाला. शहरातील तिन्ही प्रमुख आळयांमधुन गोविंदा निघतो, दुपारनंतर एकामागुन एक असे ठरलेल्या क्रमाने हे गोविंदा रोहा बाजारपेठेत आले, येथिल उंच दही हंडया फोडण्यात आल्या.
दिघी | श्रीवर्धन तालुयातील वडशेत गावाजवळ असलेला पूल सध्या शेवटची घटका मोजत आहे; मात्र याकडे शासकीय अधिकार्यांचे पत्रव्यवहार करण्यापलीकडे काहीच हालचाल नसल्याचे समोर आले आहे, त्यामुळे या पावसाळी दुर्घटना घडल्यास तब्बल नऊ गावांचा संपर्क तुटण्याची शयता आहे.
श्रीवर्धन | श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयाच्या आवारामध्ये कचरा व घाण व चिखल याचा खच पडला असून त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली पहायला मिळते. गोखले महाविद्यालयाच्या परिसरातच गोखले विद्यालयाची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
म्हसळा | म्हसळा तालुक्यात आणखी एका वृध्दाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (३१ जुलै) रोजी समोर आली आहे. ही हत्या नातवानेच केल्याची माहिती समोर आल्याने म्हसळ्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी म्हसळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
म्हसळा | म्हसळा तालुक्यातील वांगणी, मोरवणे, घूम परिसरात बिबट्याने चांगलीच दहशत निर्माण केली आहे. गेल्या तीन महिन्यांत मोरवणे गावातील दोन शेतकर्यांची गोठ्यात बांधलेली तीन वासरे, घूम गावातील एकाच शेतकर्याची दोन वासरे बिबट्याने फस्त केली आहेत.
पेण | मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा रेस्टॉरंटसमोर एनपीआर सीसीटिव्ही कॅमेरांचे लोकार्पण आज, १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.
पेण | पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीचा होत असलेला अधिकचा विस्तार फेज-३ पाहता येथील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे विस्तारीकरणाला शिर्की गावातील आमच्या काही ग्रामस्थांचा जाहीर पाठिंबा असल्याचे येथील सामाजिक कार्यकर्ते शेखर पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
पनवेल | गोपाळकाला निमित्त गोविंद पथकाकडून थरावर थर लावत मानवी मनोरा तयार करण्यात आला. हा सहासी खेळ सर्वत्र लोकप्रिय आहे. त्याशिवाय दहीहंडी उत्सव अपुरा आहे. दरम्यान थरांचा थरार लावला जात असताना त्याला कामोठे येथे शनिवारी शिवकालीन युद्ध कलेची एक प्रकारे सलामी देण्यात आली. शितल दिनकर, जयश्री झा सुद्रिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिजाऊ पथकाने लाठीकाठी , तलवारबाजी आणि दांडपट्ट्याचे प्रत्यक्षिके सादर केले.
सुधागड-पाली | पालीतील सरसगड किल्ल्यावरून पडून एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निखिल कदम असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा सातारा येथील आहे व पुणे येथे नोकरी करतो. एका कंपनीचा ग्रुप पुण्यातून पालीतील सरसगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आला होता.
खोपोली | खंडाळा घाटातील मंकी हिल रेल्वे ट्रॅकवर पेट्रोलिंग करणार्या कामगारांमध्ये झालेल्या शाब्दीक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. रमेशचंद्र वर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.
उरण | तीन दिवसांपासून कोसळणार्या पावसाचा तडाखा उरण तालुक्याला बसला असून अनेक रहिवाशांच्या घरांची पडझड झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहन चालक बेजार झाले आहेत. झाडे उन्मळून पडली आहेत. विशेष म्हणजे न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या इमारतीत पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली आहे.
उरण | उरण तालुक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दही हंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी गोविंदा रे गोपाळा - - -तुझ्या घरात नाही पाणी रे घागर उताणी रे गोपाळा अशा जय घोषाने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बाल गोपाळ न्हाऊन निघाले होते.
नागोठण | सतत कोसळणार्या मुसळधार पावसाने सुधागड तालुका व रोहा, नागोठणे परिसराला अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे दोन ते तीन दिवसांपासून दुथडी भरुन वाहणार्या नागोठणे येथील अंबा नदीने शेवटच्या श्रावणी सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडी व केवनाळे येथे २२ जुलै २०२१ रोजी अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ निष्पाप जीवांचा बळी गेला. यामध्ये साखर सुतारवाडी येथे भूस्खलन होऊन सुतारवाडीतील घरेही जमीनदोस्त झाली होती. तेव्हापासून या दरडग्रस्तांची घरासाठी वणण सुरु आहे.
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या तब्बल सहा लाख रुपयांच्या विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एकाला अटक करण्यात आली असून, दोघे फरार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभाग, अलिबाग आणि महाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विभागाच्या भरारी पथकाने दिविल गावातील एका बंद घरावर छापा टाकला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सोलापूर | राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांना पालकमंत्री बनवा या मागणी चक्क सोलापूर जिल्ह्यातून मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर त्यासाठी एका पदाधिकार्याने चक्क रक्ताने पत्र लिहिले आहे. रायगडमधील पालकमंत्री भरत गोगावले यांनाच मिळावे, यासाठी शिवसेना जोर लावून आहे.
नवी दिल्ली | रायगडच्या पालकमंत्रीपदाचा पेच दिल्ली दरबारी पोहचला आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि भाजप नेते अमित शहा यांच्यातील चर्चेनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे आणि सुनील तटकरे यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी दिल्ली | स्वच्छ भारत मिशन, शहरी श्रेणीअंतर्गत आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५’च्या सुपर लीगमध्येमध्य नवी मुंबई तिसर्या स्थानी आहे. इंदूर शहराने सलग आठव्यांदा देशातील सर्वांत स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला. सुरत दुसर्या स्थानी आहे. मुंबईच्या कामगिरीत किंचित सुधारणा झाली असून शहराचा ३३ वा क्रमांक आला.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.