अलिबाग समुद्रकिनारी लायन्स फेस्टिवलचा शुभारंभ , वस्तू, खाद्यपदार्थ खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By Raigad Times    25-Jan-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | लायन्स क्लबने लायन्स फेस्टिवलची १८ वर्षांची परंपरा जपत वेगवेगळ्या व्यावसायिकांना हक्काचे व्यासवरठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिकांना एका छताखाली खाद्य पदार्थांसह विविध वस्तुंची खरेदी करता यावी, यासाठी अलिबाग समुद्रकिनारी यंदाही लायन्स फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.
 
२३ ते २७ या पाच दिवसांच्या कालावधीत होणार्‍या फेस्टिवलचा उद्घाटन समारंभ दि.२३ जानेवाी सायंकाळी विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहूल नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषात पार पडला. त्यांच्यासमवेत अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा परिषद माजी सदस्य दारकानाथ नाईक, आदी लायन्स क्लबचे पदाधिकारी व सदस्य तसेच अलिबागकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
मान्यवरांचे आगमन होताच ढोल-ताशांच्यागजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी वेगवेगळ्यास्टॉल्सची पाहणी केली. फेस्टिवलच्या माध्यमातून ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व वस्तू, खाद्य पदार्थ खरेदी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याने मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.
 
भव्यदिव्य अशा फेस्टिवलच्या शुभारंभाला अलिबागकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हँगर पद्धतीचे विस्तीर्ण दालन, सायमा पद्धतीचे अत्याधुनिक स्टॉल्स, जागतिक बाजारपेठेत नामांकित ब्रँड असलेल्या मीनल मोहाडीकर यांचे कंजूमर शॉपी या संस्थेच्या सहयोगातून सहयोग पावणेदोनशेहून अधिक स्टॉल्स महोत्सवामध्ये ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात आले आहेत. वेगवेगळ्या वस्तूंसह चटकदार व्हेज, नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांसाठी पर्वणी आहे.
 
महिला बचत गटांचेदेखील या फेस्टिवलमध्ये स्टॉल उभारण्यात आले आहेत. सायंकाळपासून ग्राहकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. वेगवेगळ्या वस्तू, खाद्य पदार्थ खरेदीला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाच दिवस ग्राहकांनी एक वेगळी संधी या फेस्टिवलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. पाच दिवस वेगवेगळे सांस्कृतिक सामाजिक, असे वेगवेगळे उपक्रम राबवून नागरिकांचे मनोरंजन केले जाणार आहे.