केबल टाकण्यासाठी विनापरवाना खोदकाम , पोलादपूरात सा.बां. उपविभागाची बीएसएनएलला नोटीस

By Raigad Times    20-Feb-2025
Total Views |
 poladpur
 
पोलादपूर | तालुयातील अनेक रस्त्यांचे २०१७ मध्ये बीएसएनएल कनेटिव्हीटीसाठी खोदकाम झाल्यानंतर तालुयातील रस्त्यांची दूरवस्था झाली होती. यंदादेखील बीएसएनएलकडून नव्याने अंडरग्राऊंड ऑप्टीकल फायबर केबल टाकण्याचे काम सुरु असून विनापरवाना कामामुळे सा.बां. उपविभागाने बीएसएनएलला नोटीस बजावली असल्याची माहिती उपविभागीय अभियंता पाटील यांनी दिली.
 
पोलादपूर तालुयातील सर्व ग्रामपंचायतींना भारत दूरसंचार निगम लिमिटेडकडून ब्रॉडबँडने जोडण्यासाठी रस्त्यालगतच्या साईटपट्टीवर चर खणून ऑप्टीकल फायबर केबल्स टाकण्याचे काम सुरु आहे. यापूर्वी २०१७ मध्ये सर्व ग्रामपंचायतींना भारत दूरसंचार निगम लिमिटेडकडून फोन जोडण्यासाठी रस्त्यालगतच्या साईटपट्टीवर चर खणून ऑप्टीकल फायबर केबल्स टाकण्यात आल्या होत्या.
 
यामुळे सर्वच रस्त्यांची जीर्णावस्था पावसाच्या सुरुवातीलाच झाली होती तर पावसाचे पाणी शिरल्यामुळे चर रुंदावले होते आणि चरावरील मातीचे ढिगारे रस्त्यावर आल्याने चिखलाचे साम्राज्य वाढले होते. पोलादपूर तालुयातील ओंबळी रत्नागिरी जिल्हा हद्द रस्ता करतेवेळी तत्कालीन आमदार माणिक जगताप यांना सदर रस्ता रायगड जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्याची विनंती करीत पत्रकार शैलेश पालकर यांनी आमसभेमध्ये तसा ठराव मांडला आणि त्यास मंजुरी मिळाली होती. यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागले. मात्र, अनेक रस्त्यांचे २०१७ मध्ये ग्रामपंचायत कनेटिव्हिटीमुळे या रस्त्याचीही दूरावस्था झाली आहे.
 
पोलादपूर तालुयामध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या अख्त्यारीतील सुमारे ३०० कि.मी. अंतराचे रस्ते असून या रस्त्यांची दुरुस्ती व नव्याने डांबरीकरण झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून सर्व ग्रामपंचायतींना भारत दूरसंचार निगम लिमिटेडकडून ब्रॉडबँडने जोडण्यासाठी रस्त्यालगतच्या साईटपट्टीवर चर खणून ऑप्टीकल फायबर केबल्स टाकण्याचे काम सुरु आहे. या ऑप्टीकल फायबर केबल्स टाकताना लोखंडी पाईपमधून टाकल्या जात असून त्यासाठी रस्त्यालगत चर खणून पूर्वीच्या ऑप्टीकल केबल असलेले पाईप काढून नवीन पाईप व नवीन केबलचा वापर करायचा आहे.
 
मात्र, याकामी बीएसएनएल अभियंत्यांच्या मर्जीतील आधीच्या पोटठेकेदाराने आणि आताच्या थेट ठेकेदाराने नियमबाह्य काम करताना रस्त्यालगत साईडपट्टीवर खोदकाम केले असून काही ठिकाणी जुन्याच लोखंडी पाईपातून नवीन ओएफसी केबल भरुन चर बुजविले आहेत. आडावळे बौद्धवाडी तसेच अनेक ठिकाणी खासगी मोटारपंपाचे पाण्याचे पाईपही या ठेकेदाराने तोडून शेतकर्‍यांचे नुकसान केले आहे. काही राजकीय कार्यकर्त्यांनी या ठेकेदाराच्या नियमबाह्य कामामुळे त्याला खिंडीत पकडून चांगला भूर्दंड सोसायला लावला आहे.
 
पोलादपूर तालुयातील रस्त्यांची दूरवस्था करणार्‍या डेप्युटी जनरल मॅनेजर, टेलिकॉम बीएसएनएल रायगड डिस्ट्रीट नवीन पनवेल या कार्यालयास पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता पाटील यांनी बजाविलेल्या नोटीशीमध्ये सदरचे काम करताना आपणाकडून सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता पोलादपूर यांच्या कार्यालयाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे नमूद करून उपविभागाकडून शास्त्रीय पद्धतीने लाईनआऊट घेऊन काम न केल्याने साईडपट्टीमध्ये काम करण्यात आले आहे.
 
काही ठिकाणी रस्त्यांच्या मोर्‍यांचे बांधकाम देखील तडे जाऊन डॅमेज झाले आहे. यामुळे अपघाताची शयता निर्माण झाली असून कोणत्याही अपघाताला सार्वजनिक बांधकाम उपविभाग पोलादपूर जबाबदार राहणार नसल्याचे स्पष्ट करून याची सर्वस्वी जबाबदारी डेप्युटी जनरल मॅनेजर, टेलिकॉम बीएसएनएलवर राहील असे नमूद करण्यात आले आहे. सोमवारी, १७ फेब्रुवारी रोजी काढलेल्या या नोटीशीमध्ये पोलादपूर सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता पाटील यांनी पुढे संबंधित रस्त्याची वरिष्ठ अधिकार्‍यांसमवेत पाहणी करून बीएसएनएलकडे काम करणार्‍या संबंधित ठेकेदार, जेसीबी चालक यांच्याविरोधात उचित कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.