रोहा | रोहा तालुयातील धाटाव बँक ऑफ इंडिया या शाखेत भरदिवसा एक धक्कादायक प्रकार गुरुवार ( २० फेबु्रवारी) घडला असुन चक्क चोरट्याने हात चलाखी दाखवत एका महिलेच्या हातातील खराब नोटा असल्याचा बहाना दाखवत पंधरा हजार रुपये लंपास केले. बँकेत सुरक्षा रक्षक असून सुद्धा चोरी होतेस कशी असा सामान्य नागरिक थेट सवाल उपस्थित करीत आहे त्यामुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
ग्राहकांच्या मनात प्रचंड प्रमाणात भीतीचे वातावरण पसरलेले आहे. तर एका अज्ञात इसमाने एका महिलेचे फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञात इसमा विरोधात रोहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान लांढर गावातीला संगीता संजय ताम्हणकर वय वर्ष ४६ या महिला गृहिणी असून पतीच्या पायाच्या ऑपरेशन साठी पैसे काढण्यासाठी धाटाव चखऊउ मधील बँक ऑफ इंडिया शाखेत गेल्या होत्या.
सदर या महिलेने बँके मधील स्वतःच्या बचत खात्यातील चेक द्वारे ५५ हजार काढले असता त्यांनी कॅश काउंटर शेजारीच पैशांच्या नोटा मोजत असताना एका फुल हाताचा सफेद व निल्या रंगाचा चेस शर्ट घातलेल्या एका अज्ञात इसमाने त्या महिलेला विचारले की तुम्ही पैसे पर्समध्ये का ठेवताय त्यातील तीन नोटा खराब आहेत.
माझ्याकडे या नोटा द्या मी त्यातील खराब नोटा बाहेर बदलून काढण्यासाठी देतो असा बहाना करून त्या चोरट्याने त्यातील पैशांचा एक बंडल आपल्या हातामध्ये घेतला व हातचलाखीने या चोरट्याने त्यातील चक्क १५ हजार रुपये आपला खिशात भरले बाकीच्या नोटा या महिलेच्या हातात देत असताना सांगितले की, यातील काही खराब नोटा आहेत त्या कॅश काउंटर कडून तुम्ही बदलून घ्या असे सांगून तो चोरटा साथीदाराला घेऊन लंपास झाला.
मात्र काही अवधी नंतर त्या महिलेच्या लक्षात आलं की यातील काही ३० पाचशे रुपयांचा नोटा गायब आहेत. महिलांनी आरडाओरडा करण्यापूर्वीच चोरटा निघून गेला होता. या महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी रोहा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास रोहा पोलीस स्टेशनचे तपासणी अंमलदार तपास करीत आहेत.