नवीन पनवेल | स्कूल व्हॅनचालकाने १६ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पनवेल तालुक्यात उघडकीस आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित मुलगी ही शेजारी राहणारे आहेत.
तीन मार्च रोजी यातील पीडित मुलगी ही कॉलेजला जात असताना तिला बस स्टॉपला सोडतो असे बोलून आरोपीने पिवळ्या रंगाच्या इको गाडीत बसवले आणि तो तिला रस्त्याने सोबत घेऊन गेला. काही अंतर गेल्यानंतर गाडी एका शेतात थांबवली आणि तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.
या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे गाठले. आणि आरोपी विरोधात १३ मार्च रोजी गुन्हा दाखल केला. पनवेल तालुका पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे. त्याला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.