पनवेल | अज्ञात करणावरुन आपल्या सहकार्याच्या डोयात २० किलो वजन टाकून त्याची हत्या केल्याची घटना करंजाडे येथे घडली आहे. ताराचंद गुप्ता यांच्याकडे काम करणारा आरोपी धरम राय याने त्याच दुकानात काम करणारा दुसरा कामगार अनिल बिंद यांच्यात अज्ञात कारणावरुन आरोपी धरम राय याने अनिल बिंद याच्या डोयात २० किलो वजन मारुन त्याची हत्या केली आहे.
या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच वपोनि नितीन ठाकरे, पो.नि.शाकीर पटेल, सपोनि घेवडेकर, केदार, पोउपनि. शेलार, सोळंके आदींच्या पथकाने सदर ठिकाणी धाव घेवून तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीने कोणत्या प्रमुख कारणावरुन सहकार्याची हत्या केली याचा पुढील शोध सपोनि घेवडेकर करीत आहेत.