सहकारी कामगाराची केली हत्या, आरोपीला अटक

By Raigad Times    17-Mar-2025
Total Views |
 panvel
 
नवीन पनवेल | करंजाडे येथे धुलीवंदनाच्या दिवशी सहकारी कामगाराची हत्या केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली आहे. धरम गोपाल राय (उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू असे मृत इसमाचे नाव आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू (वय २९ राहणार उत्तर प्रदेश) हा ताराचंद गुप्ता यांच्या करंजाडे सेटर दोन ए चैतन्य समर्थ कृपा सोसायटीत असलेल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात कामगार म्हणून काम करत होता. तर त्यांच्याकडे काम करणारा दुसरा कामगार धरम गोपाल राय यांच्यात यापूर्वी वाद होत होते.
 
१४ मार्च रोजी सायंकाळी साडे सातच्या सुमारास त्यांच्यात वादावाद झाले आणि आरोपी धरम याने दुकानातील २० किलो वजन अनिल सुदामा बिंद उर्फ गुड्डू यांच्या डोयात मारले. यात अनिल सुदामा बिंद हा जखमी झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिल्यानंतर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पनवेल शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी धरम गोपाल राय याला अटक केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.