पत्नी, मुलीच्या आत्महत्ये प्रकरणी पनवेल पोलिसांनी केले नवर्‍याला अटक

By Raigad Times    17-Mar-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | नवर्‍याचे अन्य स्त्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याने तो पत्नीला मारझोड करून मानसिक व शारीरिक छळ करीत असल्याने त्यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले, असा दावा करून सासूने जावयाविरोधात गुन्हा दाखल करताच पनवेल शहर पोलिसांनी नवर्याला अटक केली आहे पळस्पे फाटा येथील मॅरेथॉन नेसॉन गृहसंकुलातील औरा इमारतीच्या २९ व्या मजल्यावर आशिष दुवा कुटुंबं राहत होते.
 
दोन दिवसांपूर्वी आशिषची पत्नी मैथिली हिने पोटची आठ वर्षीय कोवळी मुलगी मायरा हिला निर्दयीपणे बेडरूमच्या खिडकीतून फेकून हत्या केली. त्यानंतर स्वतःची जीवनयात्रा संपविण्यासाठी त्याच खिडकीतून उडी घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
 
पनवेल शहर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेवून मयत मैथिली हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह आशिष दुवाच्या ताब्यात दिले. दोघींवर पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मैथिलीची आई आणि आशिषची सासू असलेल्या नीता सुहास देवराईकर (रा. अहिल्यानगर) यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत त्यांच्या मुलीच्या आत्महत्येला जावई कारणीभूत असून त्याचे विवाहबाह्य संबंध आहेत.
 
तो पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत असल्याने तीने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे म्हटले आहे. मैथिलीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल आशिष दुवाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो पळून जावू नये याची दक्षता घेवून त्याला अंत्यविधीनंतर पुण्यातून ताब्यात घेवून त्याला अटक केली आहे.