मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाची आ.दरेकरांकडून पहाणी

By Raigad Times    18-Mar-2025
Total Views |
 mahad
 
महाड | महाड येथे होऊ घातलेल्या या रुग्णालयाचे केंबुर्ली येथे काम सुरू झाले असून ज्यांच्या प्रयत्नाने हे रुग्णालय उभे रहात आहे, ते भाजपाचे गट नेते आमदार प्रविण दरेकर यांनी काल या रुग्णालयाच्या कामाची पहाणी करुन अधिकार्‍यांना सूचना दिल्या. तसेच या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करणार असल्याचे दरेकर या वेळी म्हणाले. भाजपचे विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांच्या प्रयत्नातून महाड येथे २०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय होत आहे.
 
केंबुर्ली येथील महामार्ग लगत जवळपास ६.५ हेक्टरमध्ये १४७.७ कोटी खर्च करून हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. शनिवारी (१५ मार्च) आ.प्रविण दरेकर यांनी या कामाची प्रत्यक्ष पहाणी केली. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, संदीप ठोंबरे, सरचिटणीस महेश शिंदे, साबाचे कार्यकारी अभियंता महेश नामदे, उपअभियंता तुकाराम सणालकर उपस्थित होते. सदर रुग्णालय हे २०० खाटांचे असून यामध्ये सर्वप्रकारचे उपचार, शस्त्रक्रिया, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया होणार आहेत.
 
१९ हजार ८३० चौरस मिटर एवढ्या भव्य स्वरुपाची पाच मजली मुख्य इमारत होणार असून दोन्ही बाजूने ७ मिटरचे रस्ते होणार आहेत. कालांतराने या ठिकाणी आपण वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याचा माणस दरेकर यांनी यावेळी बोलून दाखविला. रुग्णांलयासाठी व पंचक्रोशीतील गावांना उपयोगी पडेल, अशी भव्य पाणी योजनादेखील आपण मंजूर करणार असल्याचे सांगितले.