मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील

By Raigad Times    20-Mar-2025
Total Views |
 mumbai
 
मुंबई | मत्स्यव्यवसाय विभागाला स्वावलंबी आणि सक्षम करण्यात येत आहे. याचबरोबर मत्स्य व्यवसायास शेतीचा दर्जा देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री यांच्या कार्यालयातील दालनात पालघर जिल्ह्यातील मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विविध अडचणीबाबत आयोजित बैठकीत राणे बोलत होते.
 
मत्स्यव्यवसाय मंत्री राणे म्हणाले की, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाशी निगडित कौशल्य प्रशिक्षण त्या त्या ठिकाणी आयोजित करण्यात येईल. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मत्स्यव्यवसाय विकासासाठी दहा टक्के राखीव निधी ठेवण्यासाठी महसूल मंत्री यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
 
mumbai
 
दरवर्षी १५ एप्रिलपासून मासेमारी करण्यास बंदी असते. मासेमारी बंदी करण्याचा कालावधी महाराष्ट्रात ६१ दिवसांचा आहे. हा कालावधी वाढवण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येईल. या निर्णयामुळे मत्स्य उत्पन्नात निश्चित वाढ होणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.