रायगडात १४९६ पैकी ७५१ पाणीपुरवठा योजनांची कामे पूण

By Raigad Times    22-Mar-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून १ हजार ४९६ पाणी पुरवठा योजना हाती घेण्यात आल्या असून, या योजनांपैकी ७५१ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर २२३ योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. पाणी पुरवठा योजना पूर्ण होऊन, घराघरात नळ कनेक्शन दिल्याने ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे. जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे.
 
तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने चांगलीच कंबर कसली आहे. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची काने गुणवत्ता पूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे.
 
अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत आहेत. या योजनेच्या माध्यमातून १५ तालुक्यांमध्ये १ हजार ४९६ योजनांची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने हाती घेण्यात आली आहेत. यामधील ७५१ योजनांची कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
 
तर २२३ योजनांची कामे ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाली असून, पुढील काही दिवसात या योजना पूर्ण करण्यात येणार आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची कामे गुणवत्तापूर्वक पूर्ण होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमातून नियमित योजनानिहाय कामांची माहिती घेण्यात येत आहे. अधिकारी कामांना भेटी देऊन कामाची पाहणी करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत ७५१ योजनांची रोह्यातील संतापजनक घटना कामे पूर्ण करण्यात आली आहेत. तसेच सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे गुणवत्ता पूर्ण होण्यासाठी आवश्यक त्या सूचना ठेकेदार अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक योजनेच्या कामाची माहिती वेळोवेळी घेण्यात येत आहे. योजनांची कामे त्वरित पूर्ण करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्यात येत आहेत. : डॉ. भरत बास्टेवाड मुख्य कार्यकारी अधिकारी, राजिप