अलिबाग | गेल कंपनी, उसर (ता.अलिबाग) येथे मोठ्या मशिनरीच्या वाहतुकीसाठी २५ मार्च रोजी सकाळी २ ते ८ या वेळेत वाहतूक नियमन लागू करण्यात आले आहे. प्रिमीयर ट्रान्सपोर्ट लि. या कंपनीमार्फत हे सेल (कार्गो) वाहतूक होणार असून त्याला वाहतुकीची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे.
हा जड माल वाहून नेण्यासाठी पुणे-चाकण-आलेफाटास संगमनेर -सिन्नर-नाशिक-इगतपुरी-कसारा घाट-कल्याण-तळोजा-पेणनागोठणे- पेझारी-अलिबाग-कुरूळ मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाहतुकीच्या वेळी कोंडी होऊ नये म्हणून प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली असून, जिल्हा वाहतूक शाखेच्या सहकार्याने योग्य तो बंदोबस्त ठेवला जाणार आहे.
२५ मार्च रोजी पहाटे २ ते सकाळी ८ या वेळेत पेण-नागोठणे-कुडूस- पेझारी-अलिबाग-कुरूळ मार्गावर वाहतूक एकाच लेनवरून चालणार आहे. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.