खोपोली | जयसिंग अलोयास कंपनीतील धुरामुळे होनाड, चिंचवली गावातील नागरिकांचे आरोग्य धोयात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते देवानंद यशवंत पाटील यांनी वारंवार करुनही प्रदुषण होत असल्यामुळे आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. होनाड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील चिंचवली गावाकडे जाणार्या रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या जयसिंग कंपनी अल्युमिनियम स्क्रॅप वितळवून अॅल्युमिनियम एग्नोट बनवले जाते.
ही प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत असते. सदर प्रक्रिया करताना मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येत असतो. त्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत असून सदर परिसरातील नागरिकांना ेशसनाचे विकार, दमा, हृदयरोग यासारख्या आजाराने सदर नागरिक त्रस्त आहेत.
कंपनीतून पर्यावरणाचे मोठा नुकसान केले जात आहे, त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त दंड आकारण्यात यावा व सदर कंपनीने आपल्याकडे जमा केलेली बँक गॅरंटी जप्त करावी व जोपर्यंत सदर कंपनी नवीन अद्ययावत यंत्रणा बसवत नाही तोपर्यंत सदर कंपनी बंद करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. सदर ही कंपनी १६ मार्चपर्यंत बंद नाही केली तर १७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता कंपनी गेटसमोर उपोषणास बसणार असल्याचे निवेदन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला सामाजिक कार्यकर्ते देवानंद यशवंत पाटील यांनी दिले आहे.