पेण | पेण तालुक्यातील नाडे गावाच्या स्मशानभूमीत रात्री १ वाजण्याच्या सुमारास ५ ते ६ व्यक्तींनी अघोरी प्रथेचा डाव मांडला होता. याची खबर नाडे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी स्मशानभूमीवर येऊन पाहिले तर कोणतरी एका जीवंत व्यक्तीला कपड्यात बांधून स्मशानभूमी सभोवताली फिरवत होता.
याबाबत ग्रामस्थांनी त्यांना पुढे जाऊन विचारणा करताच या अनोळखी व्यक्तींची पळापळ झाली. ग्रामस्थांनी यातील २ व्यक्तींना पकडले आणि पेण पोलिसांना बोलावून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी स्मशानभूमीवर हा अघोरी प्रकार करणार्या टीमने नारळ, लिंबू, एका मनुष्यदेहाची कवटी, हळद, कुंकू, होमाच्या समिधा, डमरू, शंख आणि इतर साहित्य मांडल्याचे आढळून आले आहे.