पेण शहरातील स्वातंत्र्य सेनानी स्मारकाचे नुतनीकरण व्हावे , ‘माझं पेण’ सामाजिक संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
 pen
 
पेण | पेण शहरातील महात्मा गांधी वाचनालय आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या स्वातंत्र्यसेनानी स्मारकाचे नुतनीकरण व्हावे, अशी मागणी ‘माझं पेण’ या सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बुधवारी (९ एप्रिल) पोलीस प्रशासन, तहसीलदार व पेण नगरपरिषदेला देण्यात आले.
 
यावेळी राजेंद्र पाटील, गणेश तांडेल, सूरज, आप्पा सत्वे, अभिमन्यू म्हात्रे, सी.आर.म्हात्रे, सुधाकर पिंगळे, गणेश कोळी, आर.एन.पाटील आदी उपस्थित होते. सध्याच्या घडीला स्वातंत्र्य सेनानी स्मारक परिसराचे फेरीवाले, खाजगी दुकाने, राजकीय पक्ष संघटना, संस्था, विविध जाहिराती, वाढदिवस शुभेच्छांच्या बॅनर्समुळे विद्रुपीकरण झाले आहे. मात्र नगरपरिषदेमार्फत कठोर कारवाई का केली जात नाही? असा सवाल संघटनेने उपस्थित केले आहे.
 
या स्मारकातील दिग्गज सेनानींची नावे दिसून येत नाही. ती नावे स्थापित करण्यात यावी. स्मारकाचे नुतनीकरण करावे, अनधिकृत बॅनरबाजीला मज्जाव करावा, नो पार्किंग झोन, जाहीर करणे, अतिक्रमण विरोधी पथकाकडून योग्य कारवाई करुन हा परिसर स्वच्छ आणि मनमोहक ठेऊन स्मारकाचे पवित्र्य राखावे, अशा मागण्या माझं पेण संघटनेतर्फे करण्यात आल्या आहेत.