चोरीचा प्रयत्न फसला...चोर पसार , निजामपूरजवळील शिरसाड बौद्धवाडी येथील घटना

By Raigad Times    10-Apr-2025
Total Views |
 mangoan
 
माणगाव | निजामपूरजवळील शिरसाड बौद्धवाडी येथील एका घरात दिवसाढवळ्या चोरीचा प्रयत्न फसला. घरातील महिलांनी आरडोओरड करताच, घरात शिरलेल्या चोरांनी पळ काढला. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, ४ अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
शिरसाड बौद्धवाडी येथील रिना सनी शिर्के यांच्या घरात ही घटना घडली. ५ एप्रिल रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमरास रिना यांचे सासरे भिकू शिर्के, सासू नंदा शिर्के हे घरातील हॉलमध्ये झोपले होते. तर त्यांचे पती सनी शिर्के व दीर स्वप्नील शिर्के हे कामानिमित्त बाहेर गेले होते. याच सुमारास तोंडाला मास्क लावलेले ४ अनोळखी इसम घराचा दरवाजा उघडून आत शिरले.
 
रिना यांना घरात कोणीतरी चोर शिरले असल्याचे लक्षात येताच त्यांनी ‘चोर चोर’ म्हणून आरडोओरड केली. त्यामुळे चोरांनी पळ काढला. ओरडण्याच्या आवाजाने भिकू शिर्के बाहेर आले, त्यांनी शेजार्‍यांना आवाज देवून झालेला प्रकार सांगितला. दरम्यान, रिना यांच्या सावधनातेमुळे ओढवलेला प्रसंग टळला असला तरी, या घटनेमुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, माणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दिली असून माणगाव पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहेत.