अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण : अभय कुरुंदकरच्या शिक्षेचा अंतिम फैसला २१ एप्रिलल

By Raigad Times    12-Apr-2025
Total Views |
 VASAI
 
वसई | बहुचर्चित अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील दोषी बडतर्फ पोलीस अभय कुरुंदकर याच्या शिक्षेचा अंतिम निर्णय आता सोमवार, दि. २१ एप्रिल रोजी होणार आहे. कुरुंदकरला दोषी ठरविल्यानंतर शुक्रवारी पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तीवाद आणि बिद्रे कुटुंबियांचे मत ऐकल्यानंतर न्यायाधीश पालदेवार यांनी अंतिम निकाल राखून ठेवला.
 
शिक्षेची सुनावणी २१ एप्रिल रोजी होणार आहे. दीड वर्षे बेपत्ता असलेल्या सहाय्यक पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांची ११ एप्रिल २०१६ रोजी हत्या करण्यात आली होती. भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्याचा तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने अश्विनी यांची हत्या करून आपल्या साथादीरांच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट लावली होती.
 
याप्रकरणी अभय कुरुंदरकर, त्याचे दोन साथीदार कुंदन भंडारी आणि महेश फळशीकर यांना पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले होते. शुक्रवारी पनवलेच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात शिक्षेसंदर्भातील सुनावणी झाली. या प्रकरणातील न्यायालयातील कामकाज दुपारी तीन तास चालले.
 
यादरम्यान न्यायालयाने बिद्रे कुटुंबियांची बाजू ऐकून घेतली. सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी कुरुंदकर याला फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी केली. परंतु आरोपीचे वकील विशाल भानूशाली यांनी पुराव्याच्या आधारे यापूर्वी इतर न्यायालयाने सुनावलेल्या अंतिम निकालांच्या आदेशाची प्रत न्यायालयात सादर केली.