मुंबई | काही वर्षांत पिक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळालनी नाही. मात्र या पिकविमा योजनेचा फायदा शेतकर्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झाला आहे. तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात. मागच्या ५ वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र ५० हजार कोटींचा नफा झाला आहे.
देशात २०१९ ते २०२४ या ५ वर्षांत एकूण १७ पीक विमा कंपन्यांना १ लाख ५४ हजार ५४३ कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला. या ५ वर्षात शेतकर्यांना नुकसान भरपाई म्हणून १ लाख ५ हजार कोटी रुपयांची मदत मिळाली. म्हणजेच उरलेली ४९ हजार ७०४ कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावला आहे.
फक्त महाराष्ट्रात २०१६-१७ पासून पीकविमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली. २०१६ ते २०२४ या ८ वर्षांत विमा कंपन्यांना ४३ हजार २०१ कोटींचा हप्ता मिळाला. यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेली एकूण रक्कम आहे. विमा कंपन्यांकडून शेतकर्यांना ३२ हजार ६१० कोटी रुपये भरपाई, विमा कंपन्यांनी शेतीच्या नुकसान भरपाईपोटी शेतकर्यांना ३२ हजार ६१० कोटी रुपये दिले. म्हणजेच ८ वर्षात विमा कंपन्यांना १० हजार ५९१ कोटींचा नफा झाला.