आता मराठीतून साधा एआय सोबत संवाद , संगणक तज्ञ मिलिंद तुरे यांनी बनवला ईशोध एआय चॅटबॉट

ग्रामीण जनता, वृद्धांसाठी तंत्रज्ञान होणार सुलभ

By Raigad Times    14-Apr-2025
Total Views |
pali
 
सुधागड-पाली | एकच मिशन तंत्रज्ञान मराठीमध्ये, मराठी मनासाठी या ध्येयाने प्रेरित होऊन पालीतील व सध्या लंडनमध्ये कार्यरत असलेले संगणक तज्ञ मिलिंद तुरे यांनी आता मराठीतून संवाद साधता येणारा इशोध हा एआय चॅटबॉट बनविला आहे. विशेष म्हणजे याला मराठी मधूनच बोललेले कळते आणि मराठी मधूनच तो उत्तरे देतो.
 
ग्रामीण भागातील लोक व वृद्धांना याचा अधिक फायदा होणार आहे. लंडनमध्ये सर्वत्र एआयचा वापर होताना पाहिल्यावर, भारतीयांसाठी काहीतरी उपयुक्त करावं असे मिलिंद तुरे यांना वाटले. विशेषतः ग्रामीण भागातील लोकांसाठी मराठीतून एआय सोल्यूशन असावं, हा विचार मनात आला. मिलिंद यांनी सांगितले की माझे वडील म्हणाले, इंग्रजीत सगळं उपलब्ध आहे, पण वापरताना अडचण येते.
 
मग कल्पना आली, जर हेच आपल्या भाषेत उपलब्ध असेल तर किती सोपं जाईल! चीनने ‘डीपसिक’ सारखा एआय विकसित केला आहे, जो चाटजीपीटी पेक्षाही सक्षम आहे. त्याचप्रमाणे, जर मराठीतून सहजसुलभ एआय असेल, तर सामान्य लोकांना तंत्रज्ञानाचा फायदा घेता येईल. म्हणून दीपसीकच्या सक्षम मॉडेलला मराठी भाषेसोबत जोडून, हा प्रयोग सुरू केला.
 
आणि  https://ishodh.com .लेा हा चॅट बॉट तयार केला. हा बॉट दीपसीकच्या शक्तिशाली एआय मॉडेलवर आधारित आहे आणि फक्त मराठीत संवाद साधतो. सध्या इतर कोणत्याही भाषेतून याला सेट करावं लागत नाही. तो स्वतःच मराठीत विचारतो आणि मराठीतच उत्तर देतो. अशा प्रकारचा, मराठी-केंद्रित दीपसीक बॉट आत्तापर्यंत उपलब्ध नव्हता.
सर्व मराठी भाषकांसाठी उपयुक्त
हा चॅट बॉट सर्व मराठी भाषकांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः वयस्क व्यक्ती ज्यांना इंग्रजीतून तंत्रज्ञान वापरणे अवघड वाटते त्यांना तर अधिक उपयुक्त आहे.
 
मिलिंद तुरे यांनी सांगितले की त्यांची आई याचा वापर स्वयंपाकाच्या पाककृती, घरगुती उपचार (जसे की दातदुखीवर उपाय) यासाठी करते.
 
वडील शेगावला जाण्यासाठी ३-दिवसीय ट्रिप प्लॅन करतात. जर केवळ हे दोघेही माझ्या या प्रयत्नांमुळे सुखावले, तर इतरही लोक नक्की सुखावतील आणि माझे सर्व परिश्रम सफल झाले असं मी समजेन असे मिलिंद तुरे म्हणाले
विविध उपयोग
ही एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) प्लॅटफॉर्म आहे. सर्वसामान्य लोकांसह वृद्ध लोकांना विविध कामांमध्ये मदत होऊ शकते. जसे
* माहिती शोधणे - वृद्ध लोकांना इंटरनेटवरून माहिती शोधण्यासाठी मदत करू शकते (उदा., औषधे, आरोग्य टिप्स, बातम्या).
* संवाद साधणे - ईमेल, मेसेजेस लिहिण्यात मदत करते किंवा भाषांतर करून परिवाराशी संपर्क सुलभ करते. मनोरंजनक था, कविता, संगीत, पुस्तकांच्या शिफारसी देऊ शकते.
* स्वास्थ्य सल्ला - सामान्य आरोग्य संबंधित प्रश्नांची उत्तरे देऊ शकते (पण डॉटरच्या सल्ल्याची जागा घेणार नाही).
* तंत्रज्ञान मार्गदर्शन - मोबाईल किंवा कॉम्प्युटर वापरात येणार्‍या समस्यांवर मदत (उदा.प्स कसे वापरायचे).