कर्जत | तालुयाचे प्रवेशद्वार असलेल्या कर्जत चारफाटा येथील हुतात्मा भाई कोतवाल चौक येथील पथदिवे बंद पडले आहेत. त्यामुळे कर्जत चार फाटा परिसरात अंधाराचे साम्राज्य दिसत असून शासनाने त्या ठिकाणी सौर दिव्यांचे पथदिवे बसवावेत अशी मागणी होत आहे. सन २०२२ मध्ये सामाजिक कार्यकर्ते सुरेश बोराडे यांच्या पाठपुराव्यामुळे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांनी ठेकेदार कंपनीने सेस फंडातून मोठे दिवे असलेले पथदिवे बसवले होते.
त्या पथदिव्यांची खाली गेली अनेक महिने अंधार आहे. त्याचे कारण म्हणजे कर्जत चारफाटा येथील पथदिवे ज्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत त्या हालीवली ग्रामपंचायतीचे आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे त्या पथदिवे यांचे वीज बिल थकले आणि महा वितरण कंपनी कडून त्या पथदिव्यांची वीज कापली. गेल्या वर्षभरात वीजबिल थकल्याने महावितरणने या दिव्यांचे कनेशन तोडले असून चारफाटा हा कर्जत तालुयातील वाहतुकीचा केंद्रबिंदू अंधारात आहे.
रात्रीच्या वेळी एसटी बस, खासगी वाहने, टॅसी यांची रेलचेल असलेल्या या ठिकाणी रात्रीचा अंधार हा अक्षरशः धोका बनला आहे. नगरपरिषद आणि ग्रामपंचायतीमधील जबाबदारीची गोंधळलेली स्थिती असून त्या पथदिव्यांची दुरुस्ती देखील कोणी करीत नाही. ग्रामपंचायत आणि नगरपरिषद यांच्या वादात कर्जत चारफाटा येथील पथदिवे अडकून पडले असून त्याचा फटका थेट या भागातून पायी प्रवास करणारे स्थानिकांना बसत आहे.