पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील बाजिरे येथील एका शेतकर्याच्या गुरांच्या वाड्याला वणव्यामुळे अचानक आग लागली. या आगीत वाडा पूर्णतः भस्मसात झाला असून, वाड्यात असलेल्या काही छोटी वासरे व एक गाय होरपळून गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना. सोमवारी, १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
यातील तीन गुरे दगावल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. या आगीची माहिती मिळताच काळभैरव रेस्क्यू टीम आणि फायर ब्रिगेडने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. गेल्या काही दिवसांपासून कापडे भागात वारंवार लागणार्या वनव्यांमुळे जनावरांचे, वनसंपत्तीचे तसेच ग्रामस्थांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे आता तरी वनविभागाने योग्य ती जबाबदारी घ्यावी, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.