ट्रेलरच्या धडकेत आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

By Raigad Times    16-Apr-2025
Total Views |
 uran
 
उरण | उरण तालुक्यातील जेएनपीए पोर्ट ते पनवेल मार्गावरील फ्री गेट सिग्नलजवळ रस्ता ओलांडताना भरधाव ट्रेलर चालकाने एका आठ वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना घडली आहे.
 
ज्योती भागवत शिंदे (वय ८) असे मृत मुलीचे नाव आहे. भागवत शिंदे कुटुंब आपल्या दिवसभराच्या मजुरीच्या कामावरून घरी म्हणजे नवघर येथे परतत होते.
 
त्यावेळी रस्ता ओलांडताना वेगाने आलेल्या ट्रेलरची धडक ज्योती या आठ वर्षीय मुलीला बसली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी न्हावा पोलीस ठाण्यात ट्रेलरचालक अभयकुमार रामधणी गौतम याच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.