पोलादपूर येथून वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता
By Raigad Times 16-Apr-2025
Total Views |
पोलादपूर | पोलादपूर तालुक्यातून एक वीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. अक्षरा शुभम पवार असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून ती सध्या गोकुळधाम सोसायटीच्या मागे राहत होती.
१२ एप्रिल रोजी सकाळी नोकरी बघायला जाते असे तिच्या आईला सांगून ती घरातून निघून गेली ती अद्यापपर्यंत घरी परतली नाही. अक्षरा बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा पती शुभम विकास पवार याने पोलादपूर पोलीस ठाण्यात दिली आहे. डाव्या हातावर मुलाचा फोटो गोंदवलेला असल्याचे पोलिसांनी या मिसिंग तक्रारीमध्ये नमूद केले आहे.