अलिबाग | देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कणखर नेतृत्वात भाजपा एक बलाढ्य पक्ष म्हणून पुढे आगेकूच करीत आहे. समाजातील उपेक्षित घटकाला न्याय मिळावा यासाठी लढे पुकारुन झटत होते, असे शेकापचे कार्यकर्ते भाजपमध्ये सामील झाले, त्यांचे मनापासून स्वागत.
माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी व विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत, त्यांनी पक्षप्रवेश करताना कोणत्याही अटी शर्थी ठेवल्या नाहीत, मात्र पंडित पाटील हे पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत, अशी सर्वांची इच्छा असून त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.
पंडित पाटील, आस्वाद पाटील यांच्यासह प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करुन सर्वांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल, तसेच जनहित व विकासात्मकदृष्ट्या आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिले. तसेच कुणी बोलत असले की त्यांच्या जाण्याने फरक पडणार नाही; पण येणारा काळच ते ठरवेल, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे.