दलीप देसले यांचा पार्थिव विशेष विमानाने मुंबईत

By Raigad Times    24-Apr-2025
Total Views |
 panvel
 
पनवेल | जम्मू- काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत झालेल्या नवीन पनवेल येथील रहिवासी दिलीप देसले यांचे पार्थिव बुधवारी (२३ एप्रिल) दुपारी विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. यानंतर रुग्णवाहिकेद्वारे पनवेलमधील निवासस्थानी आणण्यात आले.
 
या घटनेची माहिती मिळताच पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ताबडतोब दिलीप देसले यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना सांत्वना दिली. दिलीप देसले यांचे पार्थिव बुधवारी दुपारी विशेष विमानाने मुंबईत आणण्यात आले. मुंबई विमानतळावर भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे मंत्री आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, गुलाबराव पाटील, दादा भुसे, योगेश कदम उपस्थितीत दिलीप देसले यांचे पार्थिव विमानतळावरून रुग्णवाहिकेद्वारे निवासस्थानी नेण्यात आले. तेथे शोकाकूल वातावरणात कुटुंबिय, नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.