अलिबाग | काश्मीर पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा निषेध बुधवारी रायगड जिल्ह्यात करण्यात आला. म्हसळा, सुधागड, नेरळ, पनवेल, कर्जत, पोलादपूर येथे या घटनेचा नागरीकांनी निषेध व्यक्त केला.
नेरळ | शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नेरळ यांच्या माध्यमातून पहेलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाकडून आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार नेरळ गावातील नागरिक यांनी निषेध ठिकाणी गर्दी केली होती. या हल्लेखोरांना पाकिस्तानात किंवा पाताळात लपले असतील तेथून शोधून आणण्याचे आवाहन महिला आघाडीच्या कार्यकर्ता आणि कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती सुजाता मनवे यांनी केले.
म्हसळा | जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ म्हसळा शहर हिंदू संघटनेने बुधवारी मुख्यमंत्र्यांना पोलीस व तहसिलदार यांचामार्फत निषेधाचे पत्र देऊन हल्ला करणार्या आतिरेक्यांना यमसदनी पाठवून पाकिस्तानवर देखील कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली. यावेळी हिंदू समाज सचिव सुशील यादव, उपनागराध्य संजय दिवेकर, भाई बोरकर, रेखा धारिया, गौरव पोतदार, गणेश हेंगिष्टे, नगरसेवक सुनील शेडगे, अजय करंबे, प्रसना निजामपूरकर, राहुल जैन, शरद चव्हाण, नगरसे विका राखी करंबे, कल्पेश जैन, ग्रामस्थ उपस्थित होते.या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत.
देशातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी आणि शांतता कायम राखण्यासाठी सकल मुस्लीम समाज पनवेलतर्फे शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी ‘पाकिस्तान मुर्दाबाद, आतंकवाद मुर्दाबाद’ अशी निषेधात्मक घोषणा देऊन निषेध व्यक्त केला. या मोर्चात मुस्लीम महिलादेखील सहभागी होऊन निषेध नोंदवत होत्या. यामध्ये प्रामुख्याने इकबाल काझी, माजी नगरसेवक मुकीत काझी, जैनाब शेख, संतोष पवार, सोफिया मुकादम, सलमान मुकादम, पंचशील शिरसाट, जमीर पठाण, सुश्मिता मोहिते, रेहाना हुसेन, नावेद पटेल, नवाद पटेल, अदनान अन्सारी, बिस्मिल्ला करंबेळकर, सना शेख, सलमा कच्ची रजिया कच्ची, कैकशा शेख, मॅरियम करंबेलकर यांच्यासह मुस्लीम समाजाला या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी विविध समाजबांधव सहभागी झाले होते.

पोलादपूर | दहशतवादी हल्ल्याचा पोलादपूरवासीयांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पाकिस्तानचा ध्वज दहन करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शिल्पा दरेकर, विरोधी पक्षनेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्नील भुवड, नगरसेवक नागेश पवार, नगरसेविका सोनाली गायकवाड, मृगया शहा, स्नेहा मेहता, बांधकाम कामगार सेना अध्यक्ष दत्ता मोरे, अश्विनी पवार तसेच पोलादपूर सर्वपक्षीय नेते, नागरिकांचा समावेश होता.
सुधागड-पाली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाम खोर्यात झालेल्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. सुधागड तालुक्यातील पालीकरांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. तसेच हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी, यासाठी प्रार्थना केली.
तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी अशीदेखील प्रार्थना केली. पालीकरांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील सामाजिक एकता आणि शांतता टिकवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. अशा हिंसक घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. देशातील नागरिकांनी एकत्र येऊन अशा अतिरेकी कृत्यांचा विरोध करावा, अशी भावना सुधागड तालुक्यातील उपस्थित पालीकरांनी व्यक्त केली आहे.