अलिबाग | रायगड जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी शुक्रवारी (४ एप्रिल) अवकाळी पावसाने हजेरी लावत धुमाकूळ घातला. गुरुवारी दक्षिण रायगडात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर शुक्रवारी कर्जत, खालापूर, पेणमध्ये अवकाळी कोसळला. चिरनेरमध्ये दुपारी तर अलिबागमध्ये सायंकाळी धुळीचे वादळ निर्माण झाले होते.
या अवकाळी पावसामुळे वातावरणात सुखद गारवा जाणवत असला तरी, आंबा, काजू बागायतदारांसह विटभट्टी व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.मागील ४ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत गुरुवारी (३ एप्रिल) दक्षिण रायगडातील महाड आणि पोलादपूर तालुक्यात तर शुक्रवारी (४ एप्रिल) पेण, कर्जत, खालापूरमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.
गुरुवारी महाड आणि पोलादपूर तालुक्यात संध्याकाळच्या सुमारास बरसलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. महाड बाजारात रस्त्यावरील विक्रेत्यांची तारांबळ उडाली. छत्री नसल्याने कामावरून परतणारे अडकून पडले