कर्जत | नेरळ शहरातील जुन्या बाजारपेठेतील इलेट्रिक वस्तूंची विक्री करणार्या दुकानाला पहाटेच्या वेळी आग लागली. या आगीमध्ये दुर्गा सेल्स या दुकानातील तब्बल चार लाखांच्या इलेट्रॅनिक साहित्याचे नुकसान झाले. या आगीमध्ये दुर्गा सेल्स या दुकानातील साधारण चार लाख रुपयांच्या किमती इलेट्रिक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
नेरळ येथील जुनी बाजारपेठ येथे दुर्गा सेल्स हे इलेट्रिक वस्तूंचे दुकांन आहे. या दुकानाला ५ एप्रिल रोजी पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली होती. ही आग लागली असताना पहाटेच्या सुमारास स्थानिक व्यापारी नीलेश परदेशी हे कामानिमित्ताने रस्त्याने जात असताना त्यांना दुकानांमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आले.
त्यांनी दुकान मालक रवी कटारिया यांना संपर्क करून दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. नेरळ पूर्व भागात राहणारे दुकानाचे मालक कटारिया हे काही वेळातच दुकानात पोहचले. दुकानात लागलेली आग ही स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने आटोयात आणण्यात आली.
त्यामुळे होणारी मोठी दुर्घटना टळली आहे. कारण दुकानाच्या आजूबाजूला निवासी घरे असून आग आणखी वाढली असती तर मोठे नुकसान झाले असते. मात्र आगीमध्ये दुकानातील अनेक किमती वस्तू भक्ष्यस्थानी पडल्या असून साधारण चार लाखांच्या वस्तूंचे नुकसान झाल्याची नोंद नेरळ पोलीस ठाणे येथे करण्यात आली आहे.