अलिबाग | छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय गृह अमित शाह उपस्थित राहणार आहेत. शनिवारी, १२ एप्रिल रोजी किल्ले रायगडावर हा कार्यक्रम होणार आहे. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना १८९५ साली स्थापना केली होती. मंडळाकडून १९२६ साली शिवसमाधीचा जीर्णोदार केला होता.
याला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाचे विद्यमान अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सोमवारी (७ एप्रिल) याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी यादिवशी होणारे कार्यक्रम आणि केंद्रीय गृह अमित शाह यांच्या सहभागाबाबत माहिती दिली. या कार्यक्रमात दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांना शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वशंज उदयसिंह होळकर, निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांनादेखील सन्मानित करण्यात येणार आहे. ११ आणि १२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात येणार आहे. रायगड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची आठवण करून देतो.
एके काळी समृद्ध मराठा साम्राज्याची राजधानी असलेला हा डोंगरी किल्ला शौर्य, नाविन्य आणि शौर्याच्या गाथा आपल्यासोबत ठेवतो. रायगडाचा प्रत्येक दगड आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय धैर्याची आणि दूरदर्शी रणनीतीची आठवण करून देतो, ज्यांच्या नेतृत्वाखाली या किल्ल्याला शक्तीचे प्रतीक बनवले.