अलिबाग : रायगड जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींसाठी 2025-2030 साठी तालुकानिहाय सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार तालुकानिहाय सरपंचपदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी प्राधिकृत व नियुक्ती करुन आणि सरपंच आरक्षणाची तालुक्यात सभा घेण्यासाठी तारीख निश्चितीची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
मुकेश चव्हाण,उपविभागीय अधिकारी अलिबाग-अलिबाग व मुरुड तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख अलिबाग - 22 एप्रिल 2025, मुरुड- 23 एप्रिल 2025.
श्री.प्रविण पवार उपविभागीय अधिकारी पेण-सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख दिनांक 22 एप्रिल 2025.
श्री.पवन चांडक उपविभागीयअधिकारी पनवेल- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख पनवेल तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, उरण तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
श्री.प्रकाश संकपाळ उपविभागीय अधिकारी कर्जत- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख कर्जत तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, खालापूर तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
श्री.ज्ञानेश्वर खुटवड उपविभागीय अधिकारी रोहा- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख रोहा तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, सुधागड तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
श्री.संदीपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव-सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख माणगाव तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, तळा तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
श्री.प्रविण पवार उपविभागीय अधिकारी पेण- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख महाड तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
श्री.संदीपान सानप उपविभागीय अधिकारी माणगाव- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख पोलादपूर तालुका दिनांक 24 एप्रिल 2025.
श्री.महेश पाटील उपविभागीय अधिकारी श्रीवर्धन- सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यासाठी सभेची तारीख श्रीवर्धन तालुका दिनांक 22 एप्रिल 2025, म्हसळा तालुका दिनांक 23 एप्रिल 2025.
उपविभागीय अधिकारी यांनी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964पोट नियम (4) (5) (6) नुसार त्या-त्या ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या, मागील आरक्षण यांचा सखोल अभ्यास करुन अचूक आरक्षण निश्चित करावे. सरपंथ आरक्षणाची सभा संबंधित तालुक्यात घेऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत.