रायगड जिल्ह्यातील तालुकानिहाय...सरपंचपदासाठी आरक्षण अधिसूचना

By Raigad Times    09-Apr-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | रायगड जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणूकांसाठी प्रशासनाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आता सर्व ८१० ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाकरिता पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करुन अधिसूचना राजपत्राद्वारे प्रसिध्द झाली आहे. त्यानुसार तालुका निहाय आरक्षित सरपंचपदांची संख्या निश्चित करुन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय सरपंच पदाची आरक्षण अधिसूचना जारी केली आहे.
 
अलिबाग | ग्रामपंचायत संख्या ६२, अनुसूचित जाती खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती खुला ५, महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग खुला ९, महिला ८, सर्वसाधारण -खुला १७, महिला १६.
 
मुरुड |  ग्रामपंचायत संख्या २४, अनुसूचित जाती खुला ०, महिला १, अनुसूचित जमाती खुला ३,महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग- खुला ३, महिला ४, सर्वसाधारण - खुला ६, महिला ५.
 
पेण | ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जाती- खुला १,महिला ०, अनुसूचित जमाती - खुला ७,महिला ७, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ८, महिला ९, सर्वसाधारण - खुला १६, महिला १६.फ
 
पनवेल  | ग्रामपंचायत संख्या ७१, अनुसूचित जाती - खुला २,महिला १, अनुसूचित जमाती - खुला ५,महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ९, महिला १०, सर्वसाधारण -खुला २०, महिला १८.
 
उरण | ग्रामपंचायत संख्या ३५, अनुसूचित जाती - खुला १,महिला ०, अनुसूचित जमाती - खुला २,महिला १, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ४, महिला ५, सर्वसाधारण -खुला ११, महिला ११.
 
कर्जत | ग्रामपंचायत संख्या ५५, अनुसूचित जाती - खुला १, महिला १, अनुसूचित जमाती - खुला ८, महिला ८, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ८, महिला ७, सर्वसाधारण -खुला १०, महिला १२.
 
खालापूर | ग्रामपंचायत संख्या ४५, अनुसूचित जाती - खुला १,महिला १, अनुसूचित जमाती - खुला ५, महिला ५, नागरीकांचा मागासप्रवर्ग -१०.
 
रोहा - ग्रामपंचायत संख्या ६४, अनुसूचित जाती - खुला १,महिला २, अनुसूचित जमाती - खुला ५, महिला ५, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ९, महिला ८, सर्वसाधारण -खुला १७, महिला १७.
 
सुधागड - ग्रामपंचायत संख्या ३३, अनुसूचित जाती - खुला ०,महिला १, अनुसूचित जमाती - खुला ५,महिला ६, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ४, महिला ५, सर्वसाधारण -खुला ७, महिला ५.
 
माणगाव - ग्रामपंचायत संख्या ७४, अनुसूचित जाती - खुला २,महिला २, अनुसूचित जमाती - खुला ३,महिला ४, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला १०, महिला १०, सर्वसाधारण -खुला २२, महिला २१.
 
तळा - ग्रामपंचायत संख्या २५, अनुसूचित जाती - खुला १,महिला १, अनुसूचित जमाती - खुला २,महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ४, महिला ३, सर्वसाधारण -खुला ५, महिला ७.
 
महाड - ग्रामपंचायत संख्या १३४, अनुसूचित जाती -खुला ३,महिला ३, अनुसूचित जमाती - खुला ५,महिला ४, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला १८, महिला १८, सर्वसाधारण -खुला ४१, महिला ४२.
 
पोलादपूर - ग्रामपंचायत संख्या ४२, अनुसूचित जाती - खुला १,महिला २, अनुसूचित जमाती - खुला २, महिला १, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ५, महिला ६, सर्वसाधारण - खुला १३, महिला १२.
 
श्रीवर्धन - ग्रामपंचायत संख्या ४३, अनुसूचित जाती - खुला १,महिला ०, अनुसूचित जमाती - खुला ३, महिला ३, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ६, महिला ६, सर्वसाधारण -खुला ११, महिला १३.
 
म्हसळा - ग्रामपंचायत संख्या ३१, अनुसूचित जाती - खुला १,महिला १, अनुसूचित जमाती - खुला २, महिला २, नागरीकांचा मागासप्रवर्ग - खुला ६, महिला ५, सर्वसाधारण - खुला १०, महिला १२.
 
जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती खुला १६, महिला १७, अनुसूचित जमाती खुला ६२,महिला ६२, नागरीकांचा मागासप्रवर्ग खुला १०९, महिला ११०, सर्वसाधारण -खुला २१७, महिला २१७ असे आरक्षण राहणार आहे.