पनवेल येथे वेश्या व्यवसायावर छापा , लॉज मॅनेजरसह तिघांना अटक, पनवेल पोलिसांची कारवाइ

14 Apr 2025 16:50:56
 panvel
 
पनवेल | पनवेल तालुयात असलेल्या भुषण, लॉजिंग अँण्ड बोडीग, प्लॉट नंबर एमएन १६९, नारपोली, कोन, पनवेल,जिल्हा रायगड येथे चालणार्‍या वेश्या व्यवसायावर गुन्हेशाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सहा पिडीत महिलांची केली आहे. तर लॉज मॅनेजर, चालक व वेटर अशा एकूण तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
 
नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त, संजय येनपुरे, अपर पोलिस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलिस उपायुक्त (गुन्हे) अमित काळे, नवी मुंबई यांनी पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अनैेतिक व्यापार, अवैध धंदे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत, भुषण लॉजिग अ‍ॅण्ड बोर्डिंग प्लॉट नंबर एमएन १६९, नारपोली, कोन येथील मॅनेजर हा लॉजमध्ये ग्राहकास ३ ते ४ हजार रूपये घेवुन वेश्यागमनासाठी मुली व महिला दाखवुन वेश्या व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली होती.
 
या माहितीनुसार गुन्हेशाखेच्या पोलिस पथकाने बनावट ग्राहकास सदर ठिकाणी पाठवून खातरजमा केली असता, ग्राहकाने केलेल्या सांकेतीक इशार्‍यावरून पथकाने रात्री सात वाजण्याच्या सुमारास सदर लॉजवर छापा टाकला असता, त्याठिकाणी सहा महिला वेश्यागमनाकरीता ठेवलेल्या मिळुन आल्या.
 
याप्रकरणी लॉज मॅनेजर किशोर गर्द याने लॉजमधील महिलांना बनावट ग्राहकास दाखवुन त्यांपैकी ग्राहकाने पसंद केलेल्या महिलेस वेश्यागमनाकरीता पाठवल्याचा मोबदला म्हणुन ४ हजार रूपये इतके मॅनेजर किशोर गर्द याने बनावट ग्राहक याच्याकडुन स्विकारले. मॅनेजर किशोर गर्दे, (३९), वेटर अभिलाष कृष्णा शेट्टी (२६), लॉजचालक लोकेश देवराज गौडा, (३९) तसेच अन्य एक पाहिजे असलेला लॉज चालक अशा एकूण चार जणांविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ कलम १४२३ (३), ३(५) सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा कलम १९५६ कलम ३, ४, ७ अन्वये गुन्हा दाखल करून सर्वाना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
 
गुन्हेशाखेचे सहा. छोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, एपीआय अलका पाटील, पोलिस उपनिरीक्षक सरिता गुडे, महिला पोलिस हवालदार अडकमोल, धोनसेकर व इतर सहभागी झाले होते. याबाबत पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0