कर्जत | कर्जत तालुयातील उन्हाळ्यात निर्माण होणार्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कर्जत तालुयातील पाणी टंचाईचा आरखडा तयार करण्यात आला आहे. गेल्यावर्षीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी टंचाई यावर्षीच्या उन्हाळ्यात उद्भवू शकते. त्यादृष्टीने पाणी टंचाई कृती आरखडा तयार करण्यात आला आहे.
यावर्षी तालुयात २७ गावे आणि ६८ आदिवासी वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागेल असा आरखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, गतवर्षी २०२४ च्या उन्हळ्यात १८ गावे आणि ६० आदिवासी वाड्या यांचा समावेश पाणी टंचाई कृती आराखड्यात करण्यात आला होता. त्यावेळी १६ गावे आणि २७ आदिवास्या यांना टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र पाणीटंचाई जाणवू लागल्याने एप्रिल महिना सुरू झाल्याने तत्काळ टँकर सुरू करावेत अशी मागणी येऊ लागली आहे.
कर्जत तालुका आदिवासी तालुका असून दुर्गम भागात वसलेल्या या तालुयातील उल्हास नदी वगळता अन्य नद्या या उन्हाळ्यात कोरड्या राहतात. त्यामुळे दरवर्षी मार्च महिना सुरु झाला की पाणी टंचाई जाणवत असते. त्यामुळे कर्जत तालुयातील पाणी टंचाई निवारण्यासाठी शासनाकडून पाणीटंचाई कृती आरखडा तयार करण्यात येतो. कृती आराखड्यानुसार कर्जत तालुयातील पाणी टंचाई निवारण्यासाठी विंधन विहिरी खोदणे, विहिरींची दुरुस्ती करणे आणि ट्रँकरने पाणी पुरवठा करणे आदी कामे केली जातात.
यावर्षी कर्जत तालुयात २७ गावे आणि ६८ आदिवासी वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून तेथे ट्रँकरने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाल्यावर ट्रँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने ४७ लाख ५० हजाराचा निधीची तरतूद केली आहे. कर्जत तालुयातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखालील असलेल्या पाणी पुरवठा कृती समितीकडून पाणीटंचाई दूर करण्यासाठी आराखडा बनविला आहे.
आमदार तसेच तालुयाचे तहसीलदार, कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता या अधिकार्यांनी हा आरखडा तयार केला आहे. तालुयातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी जुन्या विहिरी खोल करणे आणि त्यातील गाळ काढण्याचे काम केले जाणार आहे. नवीन विंधन विहिरी खोदणे, विंधन विहिरींचे अधिग्रहण करणे, विंधन विहीर जलभरण करणे आणि बैलगाडी तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी आराखडा तयार केला आहे.
त्या आराखड्याला एक कोटी ७४ लाख रुपये खर्च करण्याची तरतूद करण्याचा प्रस्ताव जिल्हा अधिकारी यांना पाठवण्यात आला आहे. कर्जत तालुयात मोग्रज, पिंगळस, धामणी, खानंद, अँभेरपाडा, मोहपाडा, सुतारपाडा, गरुडपाडा कळंब, किरवली भीमनगर, खांडस, ओलमण, बोंडेशेत, आशाने, चेवणे, ढाक, तुंगी, पेठ, अंथराट वरेडी, अंथरट नीड, कोशाने, सुगवे, नालधे, कडाव, आंबिवली, पळसदरी, बोरगाव या २७ गावातील नळपाणी योजना आणि तेथील पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन या सर्व गावांचा समावेश पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये करण्यात आला आहे.
तर भोपळेवाडी, आनंदवाडी, भक्ताचीवाडी, भल्याचीवाडी, पादिरवाडी आदी ठिकाणी पाणी टंचाईची स्थिती मार्चपासून उद्भवणार आहे. त्यामुळे या सर्व आदिवासी वाड्यांचा समावेश पाणी टंचाई कृती समिती यांनी त्या त्या ठिकाणी पाणी टंचाई दूर करण्यासाठी आराखडा यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर देखील कर्जत पंचायत समितीकडून कोणत्याही टंचाईग्रस्त भागाला पाण्याचे टँकर सुरू केले नाहीत. पाण्याचे टँकर सुरू होण्यासाठी संबंधित गाव किंवा आदिवासी वाडी यांच्या ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आल्यानंतर टँक सुरू करण्याची कार्यवाही केली जाते. परंतु असा एकाही प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही अशी माहिती मिळाली आहे.