रोहा | रोह्यामध्ये धाटाव एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीच्या गोदामाला मंगळवारी (१५ एप्रिल) दुपारी आग लागली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. उष्णतेमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीचे गोदाम आहे.
या गोदामामध्ये कंपनीचा कच्चा माल ठेवण्यात येतो. मंगळवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास या गोदामामध्ये आग लागली. या आगीत काही कच्चा माल भस्मसात झाल्याचे कळते. घटनेची माहिती मिळाल्यानंतर धाटाव एमआयडीसीच्या दोन अग्नीशामक दलाच्या गाड्यानी ही आग आटोक्यात आणली.