ठाकरे शिवसेनेच्या रोहा तालुकाप्रमुख पदासाठी रस्सीखेच

21 Apr 2025 14:39:55
 roha
 
रोहा | समीर शेडगे यांनी अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रिक्त झालेल्या रोहा तालुका प्रमुखपदासाठी ५ जण इच्छुक असल्याने चुरस निर्माण झाली आहे. या अनुषंगाने बोलाविण्यात आलेल्या बैठकीत शिवसैनिकांची तुफान गर्दी जमली होती. यावेळी पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशी भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केली.
 
त्यामुळे शिवसेनेचा भावी तालुकाप्रमुख कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तालुकाप्रमुख पदासह अन्य रिक्त पदांच्या निवडीसंदर्भात चर्चा करण्यासाठी ठाकरे शिवसेनेची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहात पार पडली. या बैठकीत जिल्हाप्रमुख नंदकुमार शिर्के, जिल्हा महिला संघटक डॉ. स्वीटी गिरासे आदी प्रमुख पाहुण्यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. या बैठकीत तालुका प्रमुखपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांनी आपले नावे नमूद करावी अशी सूचना जिल्हाप्रमुख नंदकुमार शिर्के यांनी मांडली.
 
त्यामध्ये विभागप्रमुख नितीन वारंगे, सचिन फुलारे, संजय भोसले, विभागप्रमुख निलेश वारंगे व प्रमोद कासकर ५ जणांनी इच्छुक असल्याचे सांगितले. त्यामुळे आता तालुकाप्रमुख पदासाठी जबरदस्त चूरस रंगली आहे.भविष्यात लवकरच रोहे तालुक्याला नवीन तालुका प्रमुख मिळणार असल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण आहे.
 
यावेळी शहर प्रमुख दीपक तेंडुलकर, श्रीवर्धन मतदारसंघ युवा सेना अधिकारी राजेश काफरे, धाटाव विभाग प्रमुख नितीन वारंगे, घोसाळे विभाग प्रमुख सचिन फुलारे,चणेरा विभाग प्रमुख मनोजभाय तांडेल, नागोठणे विभाग प्रमुख संजय भोसले, कोलाड प्रमुख कुलदीप सुतार, भातसई विभाग प्रमुख संतोष खेरटकर, माजी तालुका प्रमुख विष्णू लोखंडे, माजी शहर प्रमुख दुर्गेश नाडकर्णी, चंद्रकांत कडू, सौरभ सुर्वे, अमित कांबळे, प्रकाश वलीवकर, अ‍ॅड. प्रेरित वलीवकर, यतीन धुमाळ, मनोज लांजेकर, प्रीतम देशमुख, अनिल वर्तक, सागर भगत, भरत वाघचौरे, शैलेश चव्हाण, शंकर मिलगिरे, प्रदीप भोई आदी शिवसैनिक उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0