महावितरणचा वीज ग्राहकांना ‘डबल शॉक’! महिन्याच्या वीज बिलासह सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल

22 Apr 2025 21:57:29
 alibag
 
अलिबाग | महावितरणकडून या महिन्यात वीज ग्राहकांना वीज बिलांचा ‘डबल शॉक’ देण्यात आला आहे. एप्रिल अथवा मे महिन्याच्या वीजबिलांसोबत सुरक्षा ठेवीची अतिरिक्त रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास कमाल सहा समान मासिक हप्त्यांची सोय ग्राहकांना उपलब्ध आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे.
 
या सुरक्षा ठेवीच्या अतिरिक्त रकमेचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून वीज ग्राहकांना करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामकआयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते.
 
वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनियम १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
 
अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिलांमध्ये ग्राहकांसाठी आवश्यक सर्व माहिती देण्यात आली आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या ुुु. ारहरवळीलेा.ळप या संकेतस्थळावर व महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे सोय उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
 
Powered By Sangraha 9.0