पेणजवळ जोडप्याला लुटणारी टोळी गजाआड , मुंबई-गोवा महामार्गावर घडली होती थरारक घटना!

28 Apr 2025 19:01:48
 pen
 
पेण | मुंबई-गोवा महामार्गावर पेणजवळील तरणखोप गावालगत एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबलेल्या जोडप्याला गावठी कट्टा दाखवून लुटल्याची घटना सप्टेंबर महिन्यात घडली होती. याप्रकरणी पेण पोलिसांनी तपास करत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
 
याबाबत पेण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश वासुदेव सावंत, रा. लालबाग, मुंबई हे लक्झरी बसमधुन मूळ गावी (वरेरी ता.देवगड) प्रवास करत असताना लक्झरी बसमध्ये फिर्यादी सावंत यांचा बाजूला बसलेल्या महिला प्रवाशासोबत खिडकी उघडण्यावरून वाद झाला. याचा राग मनात धरून तरणखोप येथील न्यू मिलन हॉटेल जवळ बस थांबली असता आपल्या ६ सहकार्‍यांना बोलावून सावंत यांना मारहाण तसेच गावठी कट्टा दाखवून ठार मारण्याची धमकी दिली आणि गळ्यातील १ लाख २० हजार रुपये किंमतीची २० ग्राम सोन्याची चैन व १४ हजार रोख रक्कम ते पळून गेले.
 
सदर घटना ही १८ सप्टेंबर २०२४ रोजी घडली होती. याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला होता. या गुन्ह्याचा पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली अन्वेषण अधिकारी समद बेग व पथकाने शिताफीने व कसोशीने तपास करून यातील २७ वर्षीय महिला तसेच अक्षय सुभाष धुरी, वय. २६ वर्षे, मुळ रा.मु.पो. तळवडे, ता. देवगड, जि.सिंदुधूर्ग, सध्या गोवंडी मुंबई, गौरव संतोष धुरी, वय २८ वर्षे, अजय उर्फ जय संजय लोंखडे, वय २७ वर्षे,मुळ रा.मु.पो. तोंडापूर, ता. जामनेर, जि. जळगाव. सध्या रा.गोवंडी पुर्व मुंबई, दर्शन संतोष धुरी, वय. २९ वर्षे, संतोष शांताराम धुरी, वय ५७ वर्षे, दिपक अनिल मोरे, वय २० वर्षे, मुळ रा. मिलींद नगर, दर्यापुर, ता. भुसावळ, जि. जळगाव सध्या रा. गोवंडी यांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पो. निरीक्षक संदीप बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0