केळवली-डोलवली रेल्वेस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी सापडला मृतदेह

28 Apr 2025 16:24:11
KHOPOLI
 
खोपोली | कर्जत - खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वेस्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी बेवारस मृतदेह सापडला आहे. मृतदेह दगडाखाली लपविल्याचे प्रथमदर्शनी माहिती मिळाल्यामुळे घातपात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सदर मृतदेह चार-पाच दिवसांपूर्वीचा असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली होती.
 
मृतदेह हा पुरुषाचा असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणार्‍या कर्जत - खोपोली मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी २६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली. या घटनेची माहिती खालापूर पोलीस ठाण्यात समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार व पोलीस प्रशासनाने या ठिकाणी धाव घेत सर्व घटनेचा आढावा घेतला आहे.
 
प्रथमदर्शनी मृतदेह महिला की पुरुषाचा? याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना पोलीस प्रशासनाने सर्व घटनेचा आढावा घेतला असता पुरुष असल्याचे निष्पन्न झाले. कर्जत तालुयात गेल्या काही दिवसांपासून अनेक दुर्घटना घडल्या असून यामध्ये काही ठिकाणी मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.
 
याबाबत अनेक तर्कवितर्क वर्तवले जात असताना मध्य रेल्वे मार्गावरील केळवली व डोलवली रेल्वे स्थानकाच्या मध्यवर्ती ठिकाणी दि.२६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास एक मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार करीत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0