कर्जत | कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्जत येथील भात संशोधन केंद्रात भात पौदास आणि वाण यांची अधिक प्रमाणात निर्मिती व्हावी यासाठी ‘मुख्यमंत्री कृषी संशोधन केंद्र सुरू होत आहे.
या संशोधन संरचना प्रकल्पामुळे कर्जत भात संशोधन केंद्राची व्याप्ती वाढणार असून भाताचे वाण शोधण्यातदेखील हे केंद्र आघाडीवर येण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा आहे, असे उद्गार कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन कृषी संचालक डॉ.पराग हळदणकर यांनी काढले.
मुख्यमंत्री कृषी संशोधन केंद्र यांच्या अंतर्गत प्राप्त निधी मधून कर्जत येथील भात संशोधन केंद्रात भात जातींची जलद पैदास आणि वाणांच्या चाचण्यांबाबत संशोधन संरचना उभारणी प्रकल्प उभारला जात आहे.गतिमान पैदास प्रक्षेत्रावरील नियोजित स्थळी श्रीफळ वाढवून सदर प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक भात विशेषज्ञ डॉ. भरत वाघमोडे, तसेच विविध विभागाचे शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.