नागोठणेत मोकाट कुत्र्यांचे करणार निर्बीजीकरण

पिसाळलेल्या कुत्र्याने नागरिकांवर हल्ला केल्यानंतर ग्रामपंचायत,प्रशासन अ‍ॅशन मोडवर

By Raigad Times    28-Apr-2025
Total Views |
nagothane
 
नागोठणे | नागोठणे शहरात दिवसागणिक भटया मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे.यातच गेले तीन चार दिवसांपासून शहरातील विविध भागात एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने लहान मुलांसह सुमारे अठरा ते एकोणीस नागरिकांवर हल्ला करून चावा घेत त्यांना जखमी केल्याची घटना घडली.
 
या घटनेनंतर नागोठणे ग्रामपंचायत प्रशासनाकडून या घटनेची तात्काळ गांभीर्याने दखल घेतली आहे. नागोठणे शहरातील भटया मोकाट कुत्र्याचे निर्बीजीकरण करण्यासाठी दि.२८ एप्रिल पासून युद्ध पातळीवर निर्बीजीकरण मोहीम सुरु करण्यात येणार असल्याचे नागोठणे ग्रामपंचायतीच्या कर्तव्यदक्ष सरपंच सुप्रिया महाडिक यांच्याकडून सांगण्यात आले आहे. नागोठणे शहरातील विविध भागात ठिकठिकाणी कुत्र्यांचा झुंड दिसून येतो.
 
अनेक वेळा हे कुत्रे माणसांवर एकत्रित हल्ले करीत असतात. त्यामुळे जीव गमविण्याची भीती अधिक असते. काही वेळा दुचाकीवरून प्रवास करीत असताना कुत्रे अंगावर आल्याने अपघात होण्याची भीतीदेखील असते. नागोठणे शहरातील भटया मोकाट कुत्र्यांची दहशत गेली अनेक महिन्यांपासून वाढली असून हे भटके कुत्रे शहरातील विविध टोळयाने मुक्त संचार करीत सर्वत्र अक्षरशः हैदोस घालत आहेत.
 
त्यातच २३ एप्रिल रोजी पासून दोन ते तीन दिवसात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने शहरातील विविध भागातील लहान मुलांसह सुमारे अठरा ते एकोणीस नागरिकांना चावा घेतला. या घटनेनंतर सरपंच सुप्रिया महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत अधिकारी राकेश टेमघरे यांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मदतीने प्रशासनाने लागलीच शोध पथक तयार करत या कुत्र्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु पिसाळलेला मोकाट कुत्रा काही शोध पथकाच्या हाती लागला नाही.
 
दरम्यान मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरु लागले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात दोनतीन दिवसात पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने नागरिकांवर केलेल्या हल्ल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन शन मोडवर येत यावर ठोस उपाय म्हणून सरपंच सुप्रिया महाडिक यांनी तात्काळ गांभीर्यपूर्वक विचार करून दि. २८ एप्रिल पासून शहरात भटया मोकाट कुत्र्यांची निर्बीजीकरण मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
 
सदरची मोहीम नागोठणे ग्रामपंचायत प्रशासन, प्राणी संघटना रोहा व पशुधन अधिकारी पंचायत समिती रोहा यांचे मार्फत संयुक्तिक रित्या राबविण्यात येणार असल्याची माहिती देखील सरपंच सुप्रिया महाडिक यांनी दिली आहे. नागोठणे शहरातील विविध भागातील भटया मोकाट कुत्र्यांचे शय तितया लवकर शंभर टक्के निर्बीजीकरण (नसबंदी) करण्यात संबंधित प्रशासनास यश मिळाल्यास भविष्यात शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येत कमालीची घट होऊन शहरातील नागरिकांची या मोकाट कुत्र्यांच्या दहशतीपासून सुटका होऊ शकते. त्यामुळे शहरातील विविध भागातील नागरिकांनी देखील मोकाट कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासाठी ग्रामपंचायत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सरपंच सुप्रिया महाडिक यांनी केले आहे.
 
नागोठणे गावात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालून अनेक ग्रामस्थांना जखमी केले याची विशेष दखल घेऊन खबरदारी म्हणून नागोठणे गावातील भटया कुत्र्याचे निर्बीजीकरण लसीकरण मोहीम दि.२८ पासून सुरु करणेत येणार आहे. ही मोहीम ग्रामपंचायत नागोठणे, प्राणी संघटना रोहा व पशुधन अधिकारी पंचायत समिती रोहा यांचे माध्यमातून संयुक्तिक रित्या राबविण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून भटया कुत्र्यांचे निर्बीजीकरण (नसबंदी) करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे मंजुरी करिता पाठविण्यात आला आहे. -सुप्रिया महाडिक, सरपंच-ग्रामपंचायत नागोठणे