माझ्या वाटेला येईल ते सुधाकर घारेंना दिले जाईल , माजी आ. अनिकेत तटकरेंचे आश्वासन

29 Apr 2025 17:54:40
 KARJT
 
कर्जत | विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा निसटता पराभव झाला असला तरी सुधाकर घारे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार वाटत आहेत. त्याचवेळी तुम्ही सत्तेत आहात कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा राज्यातील महायुती सरकारमध्ये ३३ टक्के वाटा आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी आपण सत्तेत आहोत हे ध्यानात ठेवून विकास कामे करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि त्यातून आपला पक्ष दोन्ही तालुयात क्रमांक एकचा पक्ष आहे, असे विधान परिषदेचे माजी सदस्य अनिकेत तटकरे यांनी म्हटले.
 
सुनील तटकरे यांचे अदिती तटकरे आणि माझ्यावर प्रेम आहे, तेवढे प्रेम सुधाकर घारे यांच्यावर असून माझ्यासाठी पक्ष जे देईल ते, आधी सुधाकर घारे यांच्यासाठी दिले जाईल, असे ओशासनही अनिकेत तटकरे यांनी दिले. कर्जत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कर्जत येथील पक्ष कार्यालयात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी माजी आ. अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश पदाधिकारी शरद कदम, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, खालापूर तालुका अध्यक्ष अ‍ॅड. संतोष बैलमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रवींद्र झांजे, माजी उप सभापती जयवंती हिंदोळा, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा उपाध्यक्ष अनिस बूबेरे, ज्येष्ठ कार्यकर्ते दीपक श्रीखंडे, महिला आघाडी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुरेखा खेडेकर, युवक अध्यक्ष अ‍ॅड. स्वप्नील पालकर, जिल्हा युवक सरचिटणीस उत्तम पालांडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
 
सुरुवातीला जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे यांनी प्रास्ताविक करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जुने सहकारी हे पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यांचा पक्ष प्रवेश नसून त्यांची घरवापसी आहे, असे सांगून ते मागे अन्य पक्षात असले तरी त्यांचे प्रेम हे सुधाकर घारे यांच्या पाठीशी होते, असे म्हटले. याप्रसंगी रवींद्र झांजे, भूषण पाटील, संतोष बैलमारे, सुरेखा खेडकर यांची यथोचित भाषणे झाली.
 
या कार्यक्रमात साळोख ग्रामपंचायत माजी सरपंच आवेश जुवारी, ज्येष्ठ कार्यकर्ते सलाम शेख तसेच मोग्रज ग्रामपंचायत माजी सरपंच अर्जुन सकपाळ यांनी तसेच साळोख ग्रामपंचायतमधील कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला. विधान परिषदेचे माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी सुधाकर घारे निवडून आले नसले तरी कर्जत आणि खालापूर तालुयातील जनतेच्या मनातील आमदार आहेत असे आम्ही मानतो. आपण सत्तेमध्ये असून महायुतीच्या सरकारमध्ये आपल्या पक्षाचा ३३ टक्के वाटा आहे. नेतेमंडळी एकत्र येतात आणि त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, हे मान्य आहे पण सुधाकर घारे आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नाची पक्षाला जाणीव नक्कीच आहे.
 
प्रवाहाच्या विरोधात असलेला हा मतदारसंघ असून माजी आमदार सुरेश लाड यांच्या सोबत असलेले ९९ टक्के सहकारी आज सुधाकर घारे यांच्या पाठीशी आहेत, हे पक्षावर विेशास ठेवून आहेत याचा आनंद अनिकेत तटकरे यांनी व्यक्त केला. पराभव झाला हे मान्य आहे, पण झालेला पराभव हा उल्हास नदीमध्ये सोडून द्यावा आणि पुढे कामाला लागावे असे आवाहन करून अदिती तटकरे जिंकल्या याचा आनंद आहे, तसे दुःख तुमच्या पराभवातून झाला हे जाहीरपणे सांगतो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता सुधाकर घारे यांना मोठ्या मताधियाने आमदार करण्यासाठी कटिबद्ध व्हावे, असे आवाहन अनिकेत तटकरे यांनी केले.
 
स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणूक येणार आहेत आणि त्यावेळी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट आणि मजबूत होईल असा विेशास तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते सुधाकर घारे यांनी आपण निवडणूक हरलो पण आजपर्यंत आपल्या पक्षातील एकही कार्यकर्ता पक्षातून अन्य पक्षात गेला नाही.त्याचवेळी अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे काम गेली अनेक दिवस सुरू आहे. आपल्या कार्यकर्त्यांना आणि मतदारांना खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून विकास कामे केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांचे पाठीशी उभे राहणार असल्याचे जाहीर ओशासन दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0